उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता; राणेंचं मुख्यमंत्र्यांना थेट ‘हे’ आव्हान

मुंबई :

‘गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पोरं डराव डराव करत आहेत. आपण गोष्टीत बेडकीने बैल पाहिला हे ऐकले असेल’, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांवर निशाणा साधला. यालाच प्रत्युत्तर देताना माजी खासदार निलेश राणे म्हणाले की, नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल 1 वाक्य, पण बिहारवर 20 मिनिटे. उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा… तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो.

नारायण राणेंचे दोन्ही पुत्र चांगलेच खवळले आहेत. यानंतर आमदार नितेश राणेंनीसुद्धा उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला आहे. दुसऱ्यांची पिल्लं वाईट.मग त्यांनी काय DINO च्या खुशित नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा ‘श्रावणबाळ’ जन्माला घातला आहे का?  असा सवाल करत राणे यांनी जहरी टीका केली आहे. पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की,  इतकी खुम खुमी आहे ना मग ती Disha Salain ची केस मुंबई पोलिसांवर कुठलाही दबाव न टाकता निपक्षपाती चौकशी करुन द्या.. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते! बिहारच्या अगोदरच पक्षप्रमुखानी ‘Vaccine’ घेतलेली दिसते. जास्तच हवा भरलेली आज, किती आव, ‘टाचणी’ तैयार आहे.. फक्त योग्य वेळ येऊन द्या.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here