‘या’ माजी मंत्र्यांना 3 वर्षांच्या तुरुंगवास; अटलबिहारी सरकारमध्ये होते राज्यमंत्री, वाचा काय होता घोटाळा

दिल्ली :

१९९९ साली झालेल्या झारखंड कोळसा ब्लॉक वितरणात झालेल्या कथित अनियमीततेशी सबंधित प्रकरणात माजी मंत्री दिलीप रे यांचे नाव होते. रे हे 1999 मध्ये अटलबिहारी सरकारमध्ये राज्यमंत्री होते. अखेर दिलीप रे यांना 6 ऑक्टोबरला दोषी ठरवले गेले. सीबीआयच्या एका विशेष न्यायालयाने माजी केंद्रीय मंत्री दिलीप रे यांना कोळसा घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान यापूर्वी याच प्रकरणाशी संबंधीत असणाऱ्या आणखी दोघांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. सीबीआयने तर रे यांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती. मात्र आमची वृद्धावस्था लक्षात घेऊन, तसेच पूर्वी कोणत्याही प्रकरणात आम्ही दोषी नसल्याने आमच्याबाबत नरमाईची भूमिका घ्यावी, अशी विनंती दोषी असलेल्या रे यांनी न्यायालयाला केली होती.

काय होता घोटाळा :-

रे आणि इतर संबंधितानी कोळसा ब्लॉकच्या वितरणासाठी केलेल्या खरेदीसंदर्भात एक कट रचला होता. हे प्रकरण 1999 मध्ये कोळसा मंत्रालयाच्या 14 व्या स्क्रीनिंग समितीद्वारे कॅस्टन टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या पक्षात झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात 105, 153 हेक्टर गैर-राष्ट्रीयकृत आणि सोडून दिलेल्या खनन क्षेत्राच्या वाटपाबाबतचे आहे.  कलम 120 ब (कट रचणे),409 (विश्वासघात) आणि कलम 420 (फसवणूक) , तसेच भ्रष्टाचारविरोधी कायद्याच्या विविध कलमांखाली रे यांना दोषी ठरवण्यात आले.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here