अबबब…15 लाखांची बाईक, एक किलो सोनं; वाचा बिहारच्या मोजक्या उमेदवारांची डोळे विस्फारणारी संपत्ती

पटना :

निवडणूक म्हटलं की एखादा नेत्याने आपली संपत्ती जाहीर केल्यावर उडणारे गडबड गोंधळ आपण  नेहमीच अनुभवत असतो. सध्या देशाच्या राजकीय पटलावर विविध कारणांनी चर्चेत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी आपली संपत्ती प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे.

लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव :-

  •  15.46 लाख रुपये किमतीची सीबीआर 1000 आरआर बाईक 
  • 29.43 लाख रुपयांची कार, 4.26 लाख रुपयांचे सोने
  • एकूण मालमत्ता 2.83 कोटी

अविनाशकुमार विद्यार्थी :-

  • 44.51 लाख रुपये किमतीचे एक किलो सोने
  • 14.98 लाखांची 25 किलो चांदी
  • 3.90 लाख रुपयांची 13 कॅरेट हिऱ्याची अंगठी,
  • 32 लाखांची टोयोटा फॉर्च्युनर, 9.15 लाखाची फोर्ड फिगो, साडेसात लाखांची महिंद्रा स्कॉर्पिओ, 75 हजारांची टीव्हीएस स्कूटर
  • सर्वात महत्वाचे म्हणजे 1.8 लाख रुपये किमतीची रायफल

अनंतकुमार सिंग –

हे उमेदवार सध्या त्यांच्या संपत्तीमुळे नाही तर विविध खटल्यांमुळे चर्चेत आहेत. त्यांच्यावर तब्बल 38 खटले दाखल  आहेत. आणि एवढे खटले असलेले ते एकमेव उमेदवार आहेत.  हत्ती, घोडा, गाय, म्हशी असे 1.90 लाख किमतीचे पशुधन आहे. 32.52 लाख रुपये किमतीची फॉर्च्युनर सिग्मा, 25.33 लाख रुपयांची इनोव्हा क्रिस्टा, सहा लाखांची महिंद्रा स्कॉर्पिओ आणि 31.60 लाखांचे सोने अशी त्यांची संपत्ती आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here