सरकारी योजना : महिन्यास केवळ 1 रुपया भरा आणि मिळवा 2 लाखांचा विमा

मुंबई :

सरकार अनेक विमा योजना सामान्य नागरिकांसाठी चालवित आहेत. त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. या योजनेअंतर्गत 1 रुपये महिन्यास भरल्याने 2 लाखांचा मृत्यू विमा मिळू शकेल. योजनेअंतर्गत, अनेक प्रकारचे संरक्षणे 12 रुपये प्रीमियमवर उपलब्ध आहेत. ही रक्कम आपल्या लिंक केलेल्या बँक खात्यातून दरमहा वजा केली जाते. या अंतर्गत 2 लाख रुपयांचे कव्हर उपलब्ध आहे, तर वेगवेगळ्या परिस्थितीत एक लाख रुपये मिळतील.

वाचा या योजनेविषयी मुद्देसूद :-

  • प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजने (PMSBY)  चा फॉर्म ऑनलाईन किंवा बॅंकेत जाऊन भरता येऊ शकतो. कोणत्याही बॅंकेतून हा विमा फॉर्म तुम्ही भरू शकता.
  • सार्वजनिक तसेच खासगी बॅंकांनी आपल्या वेबसाईटवर यासंदर्भात माहिती दिली आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे स्वत:चे बॅंक अकाऊंट असणे गरजेचे आहे.
  • विम्याची रक्कम थेट बॅंक अकाऊंटमधून डेबिट होणार आहे. यासोबतच www.jansuraksha.gov.in येथून फॉर्म डाऊनलोड करुन रक्कम बॅंकेत जमा करु शकता.

या आहेत अटी :-

  • प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजनेचा लाभ घेण्यासाठी बॅंक अकाऊंट असणे गरजेचे
  • अर्जदाराचे वय 18 ते 70 वर्षांपर्यंत
  • तुम्ही 18 वर्षांचे असाल तर 70 वर्षे वयापर्यंत तुम्हाला केवळ 624 रुपयेच द्यावे लागणार आहे. तसेच तुम्हाला 2 लाखाचा फायदा मिळणार आहे.

सुमारे 14 कोटी लोक प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेत आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार दर आठवड्याला दीड लाखाहून अधिक लोक या योजनेत सामील होत आहेत. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here