सरकारी नोकरीची सुवर्णसंधी : ना परीक्षा, ना मुलाखत, केवळ 10 वी, 12 वी पासची अट; असा करा अर्ज

दिल्ली :

कोरोनाच्या काळात लोकांवर आर्थिक संकट आहे. एका बाजूला हजारोंनी पगार कपात तसेच कर्मचारी कपात केली जात असताना सरकारकडून नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. दहावी आणि बारावी पास असणारे सर्वजण या पदांसाठी अर्ज करू शकता. भारत सरकारची एक कंपनी असलेल्या नॉर्दन कोलफील्ड्स लिमिटेड (NCL )मध्ये भरती काढली जात आहे. या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही किंवा मुलाखतही होणार नाही.

अशा आहेत अटी :-

१)     उमेदवार दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असावा.

२)     उमेदवारांचे वय 18 ते 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.

भरतीची मुद्देसूद माहिती :-

१)     दहावी किंवा बारावीच्या गुणांच्या आधारे निवड केली जाणार आहे.

२)     कोणतेही अर्ज शुल्क नाही. (अर्ज भरण्यासाठी व इतर माहितीसाठी कंपनीच्या वेबसाईटवर पहा)

एवढी पदे भरली जाणार :-
एचईएमएम मेकॅनिक – 120 पोस्ट
मुख्य इलेक्ट्रिशियन – 120 पदे
चीफ वेल्डर – 120 पदे
डेटा एंट्री ऑपरेटर – 120 पोस्ट
एकूण पदांची संख्या – 480

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रारंभ तारीख – 16 ऑक्टोबर 2020.
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 15 नोव्हेंबर 2020.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here