LIC ची जबरदस्त स्कीम, एक हप्ता देऊन दरमहा मिळवा 19 हजार रुपये, आयुष्यभर होईल कमाई !

दिल्ली :

भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशन म्हणजेच एलआयसी नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन आणि फायदेशीर योजना आणत असते. सध्या जगभरात आर्थिक संकट असतानाही एलआयसीने एक जबरदस्त योजना आणली आहे. वृद्धावस्थेत पेन्शनची चिंता असणाऱ्यांसाठी ही सर्वोत्तम योजना आहे. विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून तुम्ही आजीवन पैसे मिळवू शकता. जीवन अक्षय -7 (प्लॅन नंबर 857) असे या योजनेचे नाव असून ही एक प्रीमियम विना-जोडलेली, भाग न घेणारी आणि वैयक्तिक एन्युटी योजना आहे. 

अशी आहे योजना आणि तिची वैशिष्ट्ये  :-

  • 30 वर्षे ते 85 वर्ष वयापर्यंत उपलब्ध
  • दिव्यांगांना फायदा मिळवून देण्यासाठी ही योजना फायदेशीर
  • पॉलिसी जारी झाल्यानंतर तीन महिन्यांनंतर कर्जाची सुविधा उपलब्ध
  • आपण ही योजना मासिक, 3 महिने, 6 महिने आणि एका वर्षाच्या एन्युटी मोडमध्ये खरेदी करू शकता. यात ग्राहकांना किमान 12 हजार रुपयांची वार्षिकी मिळू शकते.
  • या पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूकीला मर्यादा नसतानाही तुम्ही किमान 1,00,000 रुपये गुंतवू शकता. या पॉलिसीमध्ये जर तुम्ही एकरकमी 4072000 रुपये गुंतविले तर तुम्हाला दरमहा 19 हजार रुपये पेन्शन मिळू शकते.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here