अलर्ट : चुकूनही Download करू नका ‘हे’ 22 Apps, वाचा, कोणते आहेत ते

मुंबई :

सध्या इंटरनेट आणि अ‍ॅप्सच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती चोरण्याचे प्रमाण वाढत आहे. माहिती चोरी करणारे अनेक अ‍ॅप्स बॅन करण्यात आलेले आहेत. अशातच आता अँटीव्हायरस कंपनी Avast च्या सिक्योरिटी टीम एक गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी काही अ‍ॅप्सची यादी समोर आणली आहे. ज्यामुळे तुमच्या वैयक्तिक माहिती घेतली जाते आणि इतर ठिकाणी विकली जाते.

सिक्योरिटी टीमने सांगितल्याप्रमाणे , गुगल प्ले स्टोअरवरील अनेक अशा अ‍ॅप्सची माहिती उघड झाली आहे जे युजर्सच्या फोनमध्ये खूप सारे अ‍ॅडवेअर इंस्टॉल करतात. हे अ‍ॅप्स अँड्रॉईड युजर्सना लक्ष्य करतात. आता अशाच एकूण 22 अ‍ॅडवेअर पॅक्ड अ‍ॅप्सची माहिती उघड झाली आहे. यातील 3 अ‍ॅप्स गुगलनं हटलवे आहेत. परंतु अवास्टच्या माहितीनुसार, अजूनही 19 अ‍ॅप्सची तपासणी सुरू आहे. सध्या हे अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरच उपलब्ध आहेत. या अ‍ॅप्समधील जाहिराती नोटीफिकेशन्स ते फुल स्क्रीनपर्यंत दिसू लागतात. यातील अनेक अ‍ॅप्स डेटा चोरी करून थर्ड पार्टीला पाठवतात.

अशी आहे अ‍ॅप्सची यादी :-

1) Shoot Them
2) Crush Car
3) Rolling Scroll
4) Helicopter Attack
5) Assassin Legend
6) 2020 NEW
7) Helicopter Shoot
8) Rugby Pass
9) Flying Skateboard
10) Iron it
11) Shooting Run
12) Plant Monster
13) Find Hidden
14) Find 5 Fidderences
15) Rotate Shape
16) Jump Jump
17) Find The Fidderences
18) Puzzle Games
19) Sway Man
20) Desert Against
21) Money Destroyer
22) Cream Trip

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here