अबब… साखर आहे शरीरासाठी इतकी घातक; ‘हे’ आहेत साखरेला साधे पर्याय

साखर हे शरीरात हळूहळू पसरत जाणारे विष आहे हे आपण ऐकलेच आहे. जेव्हा उसापासून साखर बनत आले  त्या संपूर्ण प्रोसेसमध्ये भरपूर केमिकल वापरले जातात त्यामुळे सरतेशेवटी साखरेत फक्त गोडवा राहतो. पोषक तत्वे सगळी निघून गेलेली असतात. अनेक जणांना मधुमेह किंवा उष्णता यासारखे आजार जडलेले असतात. त्यात ही केमिकलयुक्त साखर खाल्ल्याने इतर अनेक आजार जडतात. आणि काही होवो न होवो साखर हे खरोखरच विष आहे हे लक्षात घ्या आणि साखरेला असणारे पर्याय वापरा. जे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

हे पर्याय वापरल्यास गोडवा पण जाणवेल आणि शरीराला पोषक घटक व मिळतील. तसेच मधुमेह, लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी हे पर्याय वापरणे फायदेशीर ठरेल. 

1) खडीसाखर :- 

खडीसाखर खाण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे रक्तामध्ये खडीसाखर शोषली जाऊन तिचा साठा यकृतात केला जातो आणि गरजेनुसार ती शरीरात वापरली जाते. खडीसाखर म्हणजे साखरेचे मोठे स्वरूप आहे. ज्यावर केमिकलची प्रक्रिया कमी प्रमाणात केलेली असते. तसेच खडीसाखर औषधी गुणाची आहे. जास्त उष्णता असलेले लोक खडीसाखर खातात. यासोबतच खडीसाखर ही वीर्यवर्धक आहे. 

2) नारळापासून तयार केलेली साखर :- 

जशी उसापासून साखर तयार केली जाते त्याच पद्धतीने नारळाच्या गोड पाण्यापासूनही साखर तयार केली जाते. ही खाण्याचे प्रमाण महाराष्ट्रात कमी आहे. ही साखर तपकिरी रंगाची असून यात मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात. 

तसेच रेग्युलर साखरप्रमाणेही साखर अजिबात हानिकारक नाही. 

3) गूळ :-

आपल्याकडे तेल आणि गुळाबाबत एक गैरसमज आहे. तेल जेवढे नितळ तेवढे ते हानिकारक आहे पण आपण जास्तीत जास्त नितळ तेल खरेदी करण्यावर भर देतो. तसेच गुळाचे आहे जेवढा गूळ जास्त काळा असेल तितकाच तो शुद्ध. जेवढा गूळ फिक्कट असतो तेवढा तो केमिकलयुक्त असतो.  गूळ हे सर्वांत शुद्ध गोडवा देणारा पदार्थ आहे. 

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here