‘या’ सहा गोष्टी खाताय, समजून घ्या किडनीची वाट लावून घेताय…

बैठी जीवनशैली, बदलत्या खानपान पद्धती आणि व्यायामाचा अभावामुळे युवकांना अनेक शारीरिक समस्यांना कमी वयात सामोरे जावे लागत आहे. विशेष करून आपल्या खानपान पद्धतीचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो. आपल्याला ते सहजासहजी जाणवत नाही. परंतु त्याचे दूरगामी परिणाम होतात. आज आम्ही तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्ही खाताय तर स्वतःच्या किडनीची वाट लावून घेताय… त्यामुळे या ५ गोष्टी खाणे/पिणे टाळा :-

१) आपण या ना त्या कोल्ड्रिंक्सचे सेवन नेहमी करत असतो. कोल्ड्रिंक्स मध्ये अती प्रमाणात शर्करा, कॅलरी तर असतातच तसेच पेयांना गडद रंग, चव येण्यासाठी, टिकाऊपणा वाढवण्यासाठी जे केमिकल वापरतात त्यामध्ये फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते. जे  सर्वात जास्त आपल्या किडन्यांसाठी हानिकारक असते. 

२) सध्या रेडी टू कूक पदार्थांची चलती आहे. कारण ते झटपट होतात, टेस्टी असतात. सोयाबीनचे पदार्थ, इन्स्टंट सूप, फळांचे रस असतील यांना आपण प्राधान्याने खातो/ पितो, परंतु आपल्याला माहीत आहे का? यामध्ये सोडिअम किंवा प्रेसेर्व्हेटिव्ज् असतात. जे त्या अन्नाला किंवा पेयाला टिकवण्यासाठी त्यात समाविष्ट केले जातात. परंतु त्याचा थेट परिणाम किडनीवर होत असतो

३) सध्या चिप्स, कुरकुरे आणि इतर या प्रकारामध्ये मोडणारे पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात एकतर ते चवीला खूप छान असतात आणि दुसरे म्हणजे टाईमपास म्हणून खायला अधिकच चांगले असतात. लहान मुलांचे तर ते फेवरेट असतात. म्हणजे कधी कधी तर जेवणाऐवजी 2-3 कुरकुरे चे पॅकेट खाल्ले की जेवण झाले.

पण यात असणारा बटाटा आणि इतर पदार्थ पचण्यास कठिण असतात. त्यामुळे सोडिअम बरोबरच पोटॅशिअमचे पण प्रमाण अती असते, त्यामुळे हे किडनीसाठी खूपच हानीकारक असतात.

४) चीज, दही, बटर हे पदार्थ आपण नेहमीच वापरत असतो. परंतु या पदार्थांमध्ये असलेले कॅल्शियम हे आपल्या मुतखड्याला कारणीभूत ठरू शकते. त्यातही ज्यांना आधीपासून किडनीचा त्रास असेल त्यांनी तर हे खाऊच नये.

५) मिठाचे अतिसेवन हे तुमच्या हृदयासाठी व किडनीसाठी घातक आहे.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here