अशी बनवा ‘दसरा स्पेशल गुळाची पुरणपोळी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर

पुरणपोळी हा अस्सल मराठमोळा पदार्थ आहे. एखादा सण किंवा उत्सव आहे आणि घरी पुरणपोळी बनलेली नाही, असे सहसा कधीच घडत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सबंध महाराष्ट्राला आवडणारा असा हा पदार्थ. मस्त भरपूर पुरण, खुसखुशीत अशी ही पुरणपोळी, कटाची आमटी, गुळवणी, दुध किंवा गरमागरम तूपाबरोबर खाल्ली कि अगदी मन तृप्त करते. पुरणपोळी बरोबर कटाची आमटी, गुळवणी, कांद्याची भजी, भात आणि आणि कुरडई पापड तसेच लिंबू तुपाबरोबर हे सर्व पदार्थही केले जातात. आज आपण जाणून घेणार आहोत ‘दसरा स्पेशल गुळाची पुरणपोळी’ कशी बनवायची ते.

साहित्य घ्या मंडळीहो…

पुरणसाठी

 1. 2 कप चणा डाळ
 2. 1.5 कप गूळ
 3. 2 टीस्पून वेलची आणि जायफळ पावडर
 4. 1 टीस्पून केेशर किंवा केशर वेलची सिरप
 5. 1/2 कप तूप आणि तेल

पोळीसाठी

 • 1 कप गव्हाचे पीठ
 • 1/2 कप मैदा
 • 1 टीस्पून मीठ
 • 2 टीस्पून तूप

साहित्य घेतलं का… करा की बनवायला सुरुवात

 1. चणाडाळ कूकरमध्ये चणाडाळीच्या अडीचपट पाणी घालून शिजवून घ्यावे. कुकरच्या पाच शिट्ट्या करून घ्यायच्या. त्यामुळे डाळ लवकर शिजते डाळ शिजवताना त्यामधे एक छोटा चमचा तेल ओतायचे. त्यामुळे ते कुकर मधून ऊतू जात नाही
 2. डाळ शिजली कि त्यातील पाणी निथळू द्यावे. हे पाणी वापरून कटाची आमटी करता येते.
 3. डाळीतील पाणी निघून गेल्यावर हि डाळ पातेल्यात घ्यावे. त्यात किसलेला गूळ घालावा. पुराणांमध्ये वेलची पावडर आणि केशर वेलची सिरप घालून ते नीट मिक्स करून मध्यम आचेवर हे मिश्रण आटवावे. आटवताना सारखे ढवळत राहावे. जर ढवळायचे थांबवले तर मिश्रण पातेल्याला लागून करपू शकते.
 4. मिश्रण घट्टसर झाले कि पातेले गॅसवरून उतरवावे. मिश्रण पुरणाच्या चाळणीतून किंवा पुरणयंत्रातून फिरवून घ्यावे. मऊसूत पुरण तयार होते
 5. मैदा आणि कणके मध्ये मीठ घालून ते नीट मिक्स करून त्यात थोडं थोडं पाणी घालून पिठाचा गोळा मळून घ्यावा. कणकेचा गोळयाला तेल लावून वरवंटयाने कुटून घेऊन सैलसर मळून घ्यावे. भिजवलेले पिठ २ तास मुरू द्यावे.
 6. पुरणाचे दिड इंचाचे गोळे बनवून घ्यावे. कणकेचा अर्धा ते एक इंचाचा गोळा घ्यावा व त्याची पातळसर पारी बनवून घ्यावी. त्यात पुरणाचा गोळा भरावा. सर्व बाजूंनी बंद करून घ्यावा.
 7. पोळपाटावर थोडी गव्हाचे पिठ घेउन हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी. तव्यावर खरपूस तूप लावून भाजून घ्यावी.
 8. साजूक तूप घालून गरम गरम सर्व्ह करावी. या पोळ्या टिकाऊ असतात. आठ एक दिवस सहज टिकतात. थंड पोळ्या दूधाबरोबर छान लागतात.
 9. ताज्या गरमागरम टम्म फुगलेल्या पुरणपोळी बरोबर कटाची आमटी, गुळवणी, कांद्याची भजी, भात आणि कुरडई पापड तसेच लिंबू तुपाबरोबर हे सर्व पदार्थ सर्व्ह करावे.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here