असा बनवा ‘पनीर तवा पुलाव’; रेसिपी वाचा आणि ट्राय करा

आजवर आपण विविध प्रकारचे पुलाव खाल्ले असतील. आज आम्ही तुम्हाला एक भन्नाट आणि वेगळी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही तवा पुलावही खाल्ला असेल आणि पनीर पुलावही खाल्ला असेल मात्र या दोन्ही रेसिपी एकत्र करून एक नवा पदार्थ तयार झाला तो म्हणजे ‘पनीर तवा पुलाव’. रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा. आपल्याला नक्कीच आवडेल.

साहित्य घ्या मंडळीहो…

  1. 2 वाटी अखंड बासमती तांदूळ
  2. 1 कांदा
  3. 1 गाजर
  4. 1 सिमला मिरची
  5. 1/4 वाटी कोबी
  6. 1/4 वाटी मटार
  7. 2 ते 3 हिरवी मिरची
  8. 4 ते 5 लसूण
  9. छोटा तुकडा आले
  1. मसाला :-
  1. 2 छोटे तमालपत्र
  2. 10 ते 12 काजू
  3. 5 ते 6 केशर काड्या
  4. 5 ते 6 मिरी
  5. 1 हिरवा वेलदोडे
  6. 1 टी स्पून हळद
  7. 1 टी स्पून तिखट
  8. 1 टी स्पून गरम मसाला
  9. फोडणी साठी तेल, मोहरी जिरे
  10. चवीनुसार मिठ

साहित्य घेतले असेल तर कृती अतिशय सोपी आहे.

  1. तांदूळ धूवून अर्धा तास भिजत ठेवावे. नंतर मोकळं शिजवून घ्यावे.
  2. भाजी स्वच्छ धूवून, गाजर, कांदा, कोबी, सिमला मिरची, बेबिकॉर्न बारीक चिरून घ्यावे. लसूण, आले, हिरवी मिरची पेस्ट करून घेणे.
  3. कढईमध्ये तेल टाकून मोहरी, जिरे, काजु व सगळे मसाले टाकणं. थोडे फ्राय करून त्यात चिरलेली भाजी घालने.
  4. सगळे भाजी व मसाले करून मग त्यात हळद, तिखट घळणे. एक स्टीम देणे.
  5. तवा घेऊन त्यात तेल टाकणं. पनीरचे तूकडे केलेले त्यात वर सोते करून परत थोडे हळद, तिखट टाकणं.
  6. मग ती वरची भाजी त्या पनीर टाकणं. सगळ नीट मिक्स करून, शिजवले भात त्यात घालने. सर्व नीट मिक्स करून त्या तव्यावरच ठेवणे व गरम गरम खायला घ्या….

संपादन : संचिता कदम    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here