मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे भाऊच, म्हणाले, किती आदळआपट करशील : पंकजा मुंडे

बीड :

‘लॉकडाऊनमध्ये ऊसतोड कामगारांच्या भाकरी भिजत होत्या, आम्हाला खायला काही नाही, व्हिडीओ कॉल करून ते दाखवत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे भाऊच आहेत, त्यांनी प्रेमानं विचारलं किती आदळआपट करशील, तर मी म्हणाले ऊसतोड कामगारांसाठी आदळआपट करावीच लागेल’, असे म्हणत पंकजा मुंडेनी मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांना उत्तर देईन, असा इशारा विरोधकांना दिला.

दसरा मेळावानिमित्त  भगवान गडावर उपस्थितांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पवार साहेब, जयंत पाटील यांच्याशी ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर चर्चा झाली. शरद पवारांनाच ऊसतोड कामगारांचा प्रश्न सोडवण्यास सांगितलं.

ऊसतोड कामगारांचे निर्णय फडात बसूनच घेतले पाहिजेत असं कुणी सांगितलं. मुंबईत बसूनही निर्णय का होऊ शकत नाही?, असा सवाल करतानाच तुम्ही मुंबईत काय दिल्लीतही असला तरी इच्छा शक्ती असेल तर निर्णय होऊ शकतात. ऊसतोड कामगारांना न्याय मिळू शकतो, असं त्या म्हणाल्या.

संपादन :स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here