मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांना उत्तर देईन; पंकजा मुंडेंचा ‘त्यांना’ इशारा

बीड :

आज दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भगवान गडावर उपस्थितांना संबोधित करण्यासाठी पंकजा मुंडे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांना इशारा दिला आहे. ‘आपल्याला कुणीच हात लावू शकत नाही. बजेट कसं घ्यायचं आणि काम कसं करायचं हे मी जाणते. बीड माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मी जिथे आहे तिथेच आहे. मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांना उत्तर देईन’, असे म्हणत त्यांनी इशारा दिला.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ऊसतोड कामगारांसाठीच माझा कारखानाही मी उशिरा सुरू केला. कारण माझ्या कामगारांचा संप सुरू आहे. बोलणाऱ्याला काय होतं, जा तुम्ही संप करा सांगतात. मुंबईत बसून निर्णय होत नाहीत. ऊसतोड कामगारांचा प्रतिनिधी लवादात नको. असं ऊसतोड कामगारांच्या संघटनाच सांगत आहेत. कारखानदार ऊसतोड कामगारांचा नेता होऊ शकतो. ऊसतोड कामगारांचा नेता पक्षाचा नसतो.

मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा ऑनलाईन घेण्याचं योजण्यात आलं होतं, मात्र तरीही पंकजा मुंडेंच्या अनेक सर्मथकांनी यावेळी गर्दी केली. भगवानगडावर जाण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन नमस्कार केला. ‘जिंदगी की रेस में जो आपको दौडकर हरा नहीं सकते, वो आपको तोडकर हरानेकी कोशिश करते हैं’, मी कितीही धावायला तयार आहे पण तुटालया तयार नाही, असे त्या पुढे बोलताना म्हणाल्या. यानंतर कोण आली कोण आली महाराष्ट्राची वाघीण आली, अशा जोरदार घोषणाबाजी पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी केली. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here