बेभरवशाच्या निसर्गचक्रात कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत बांबू उत्पादन; जाणून घ्या अधिक

हवामान बदलामुळे वेळेवर पडणाऱ्या पावसाची शाश्वती कमी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक पिकांचे वारंवार होणारे नुकसान कमी करण्यासाठी बांबू वनशेती हा एक चांगला पर्याय ठरणार आहे. 

बांबूची वनशेती साधारण हलक्या, मध्यम, भारी अशा तीनही प्रकारच्या जमिनीत येते. भारतात बांबूच्या 136 प्रजाती आहेत.  महाराष्ट्रातील विदर्भात डेन्ड्रो केलामस, स्टेटस तर कर्नाटक कोकण भागात बंगलोरी इत्यादी प्रजाती आहेत महाराष्ट्राच्या इतर भागात मानवेल, कटास इत्यादी बांबूच्या जाती आहेत. बांबूच्या उत्पादनास साधारणता चार ते पाच वर्ष लागतात बांबूची वाढ ही मध्यम व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत चांगल्याप्रकारे होते.

शाश्वत उत्पन्नाचा पर्याय बांबूच का ?             

कारण की गारपीट सोसाट्याचा वारा तापमान वाढ जास्त पाऊस यांचा सहसा फारसा जास्त परिणाम बांबू शेतीवर होत नाही.  बांबूच्या उत्पादनासाठी लागणारा कमी खर्च, बांबूमध्ये रोग प्रतिकार शक्ती जास्त असल्याने बांबू रोगाला सहजासहज बळी पडत नाही यामुळे फवारणीचा खर्च अत्यंत कमी आहे तसेच उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडल्यास बांबू तग धरून जगतो .म्हणून बांबूची शेती महाराष्ट्राच्या कमी पाऊस पडणाऱ्या भागात वरदान ठरू शकते.

बांबूची बाजारपेठ व उपयोग :-

सध्या प्लास्टिक बंदी केली आहे. यावर पर्याय म्हणून पर्यावरणपूरक म्हणून बांबूच्या वस्तू वापरण्याचा कल वाढत आहे त्यामुळे बांबूची मागणी वाढत आहे. बांबूच्या उपयोग बांधकाम घरगुती उपयोग हस्तकलेचे नमुने तयार करण्यासाठी तसेच ग्लुबोर्ड, कुल्फिच्या काड्या, अगरबत्ती काड्या, नैसर्गिक कुंपण, कापड कारखान्यामध्ये, घरगुती साहित्यामध्ये, फर्निचर, वाहने, माल वाहतूकीसाठी, जैविक इंधन, इथेनॉल, शोभेच्या  वस्तू, औषधी उपयोग कपडे , अशा नानाविध प्रकारे 1500 ठिकाणी होत आहे. भारतात बांबूचे उत्पादन हे एक कोटी 35 लाख टन आहे परंतु मागणी दोन कोटी 70 लाख टनांची आहे तर एक कोटी 35 लाख टन बांबूची गरज ही आयातीच्या माध्यमातून भागविली जाते. म्हणून देशांतर्गत बांबूचे उत्पादन वाढवणे व पर्यावरण समतोल साधणे या दोन गोष्टी साध्य करण्यासाठी सरकारने 2006 पासून बांबू मिशन सुरू केले तर 2018 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद बांबूच्या उत्पादनवाढीसाठी केली होती.  

बांबू उत्पादनाचा फायदा विशेष करून बांबू शेती करणारे आदिवासी लोक यांना जास्त प्रमाणात होईल तर बांबू प्रक्रिया उद्योगात गुंतलेले प्रक्रिया व वस्तू निर्मिती उद्योग तसेच प्रशिक्षण संस्था, तसेच पर्यावरण संवर्धन होईल यामुळे बांबू उत्पादन करणे व बांबूपासून निर्मित वस्तू वापरणे ही काळाची गरज बनली आहे. 

संपादन : अशोक बडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here