दसऱ्याला आपट्याची पाने सोनं म्हणुन का वाटतात; जाणून घ्या या प्रथेमागची गोष्ट

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपटा (श्वेत कांचन) वाटप संदर्भात पर्यावरण प्रेमी ही पानं तोड़ू नये, वाटू नये म्हणून अावाहन करतात. झाड़ रक्षण करण्याच्या दृष्टिने हे आवाहन योग्य आहे. परंतुु आपट्याचे पान वाटण्यामागे वैज्ञानिक कारण आहे, ते आपण पाळत नाहीं. जसे श्रावणामधे सोमवार सोडताना बेलाचे पान खातात तसे हस्त नक्षत्र चे आसपास शरीर ऊष्मा मुळे अनेक व्याधिंचे घर बनते, तेव्हा आपटा खायचे. आपटा ही श्रेष्ठ anti cancerous वनस्पति आहे. उष्णतेच्या सर्व विकारांवर मात करणारे आहे. त्याचे महत्व अधोरेखित करणे हा सोने वाटप मागचा उद्देश आहे. त्याचा अतिरेक व बाजारीकरण झाले आहे हे खरे आहे. पण प्रथेमागे वैज्ञानिक कारण आहे. बाज़ारीकरण मूळे होणारी पानतोड थांबली पाहीजे.

आपट्याचा उपयोग शरीरासाठी केला पाहीजे. नाळगुद (Bright Disease) या रोगावर आपट्याच्या सालीचा रस गाळून दोन चमचे पोटात देतात, अथवा पाला, खरवतीची पाने वा माका एकत्र वाटून काढलेल्या रसात कुड्याचे मूळ उगाळून देतात. मुलांच्या आगपैणीवर आपट्याचा पाला दह्यात वाटून लावतात.


आपट्याचे अश्‍मंतक हे संस्कृत नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे. अश्‍मंतक म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात, अक्षरशः फुटतात. त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्‍या टेकड्यांवर आणि माळांवर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे. अश्‍मंतक याचा दुसरा अर्थ “मूतखडा (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय.
पित्तकफापहः। मधुरः शीतसंग्राही दाहतृष्णाप्रमेहजित्‌ । पित्त आणि कफदोषांवर गुणकारी; दाह, तृष्णा आणि प्रमेह यांवर विजय मिळवणारा.

हस्त, चित्रा, स्वाति नक्षत्र समयी पित्त कफ विकार वाढतात. आपटा हे या काळात अत्यंत उपयुक्त औषध आहे हे अधोरेखित करण्यासाठी आपल्या ज्ञानी पूर्वजांनी आपटा वाटप प्रथा रूजविली असावी. कालानुरूप काही कथा जोडल्या असतील. योगक्षेत्रम् परिसरात आपटाचीं हज़ारों झाड़े होती. ग्रामीणांनी ती अक्षरश: जळणासाठी तोडली. प्रत्येक वृक्षारोपण मोहिमे प्रसंगी आपटा, पळस, ख़ैर, इत्यादी  झाड़ तोड़ू नका असं अावाहन करतों. या दसऱ्याला आपट्याचं एक झाड नक्की लावा किंवा जवळपास असलेल्या एखाद्या लहान रोपाची काळजी घ्या.

संपादन : अशोक बडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here