‘त्या’ मुद्द्यावरून संजय राऊत म्हणाले; जनाची मनाची आहे, म्हणूनच…

मुंबई :

‘बिहारमध्ये निवडणुका जिंकण्यासाठी, मतांसाठी लाखोंचे मेळावे चालतात. पण महाराष्ट्रातील एका ऐतिहासिक दसरा मेळावासाठी जनाची मनाची काढली जाते? ठीक आहे, जनाची मनाची आहे, म्हणूनच हा मेळावा शिवतीर्थाच्या बाजूच्या वीर सावरकर सभागृहात आम्ही घेत आहोत’, असे म्हणत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी फटकारले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, हे मोहनराव भागवतांना देखील लागू पडतं का? सरसंघचालक हे आमचे आदरणीय आहेत. आज त्यांनी देखील म्हणजे संघाने देखील रेशीमबागेतील एका सभागृहात ज्या पद्धतीने शिवसेनेचा मेळावा आम्ही घेतो, त्या पद्धतीनेच सरसंघचालकांनी मेळावा घेतलेला आहे. आता जनाची आणि मनाची ही कुणी कोणाची काढायची आणि ठेवायची?

आम्ही नियम व कायद्याचे पालन करत आहोत. सरसंघचालक आमचे आदर्श आहेत. जर जनाची मनाची जर पाहायचीच असेल, तर बिहारमध्ये जे ५०-५० हजार व लाखांच्या संख्येने मेळावे चालले व सर्वच राजकीय पक्षाचे नेते, अगदी भाजपासह आमच्या पंतप्रधानांसह जे हजारोंचे मेळावे चाललेत. तिथं जनाची, मनाची, तनाची, धनाची कसली लाज बाळगायची?, असाही सवाल पुढे बोलताना राऊत यांनी उपस्थित केला.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here