‘त्यांनी’ जादूटोण्याच्या सहाय्याने मला मारण्याचा प्रयत्न केला; उपमुख्यमंत्री मोदी यांचे धक्कादायक आरोप

पटना :

बिहार निवडणूक सध्या देशाच्या राजकीय पटलावर गाजत आहे. बिहार विधानसभेच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर टीका करत विविध आरोप करत आहेत. अशातच ‘राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी तीन वर्षांपूर्वी आपल्याला जादूटोण्याच्या मदतीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला’, असा धक्कादायक आरोप भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी केला.

ते म्हणाले की, लालू यादव हे अंधश्रद्ध व्यक्ती असून त्यांनी मांत्रिकाच्या सांगण्यावरुन पांढरा कुर्ता घालण्याचं बंद केलं. तर शंकर चरण त्रिपाठी या मांत्रिकाला राजदचा राष्ट्रीय प्रवक्ता बनवलं. याच मांत्रकानं विंध्याचल धाममध्ये (मिर्झापूर) लालू प्रसाद यादव यांच्याकडून तांत्रिक पूजा करवून घेतली होती. तीन वर्षांपूर्वी मला मारण्यासाठी देखील त्यांनी तंत्र पूजा केली आहे.

‘लालू हे अजून १४ वर्षे तुरुंगात घालवू शकतात’ असा दावा पुढे बोलताना मोदी यांनी केला. पुढे बोलताना मोदींनी आणखी काही धक्कादायक गोष्टी उघड केल्या. ते म्हणाले की, लालू प्रसाद यादव यांचा जनतेवर विश्वास नाही. त्यामुळे ते तंत्र-मंत्राच्या पूजाअर्चा करीत असतात. प्राण्यांचे बळी आणि आत्म्यांची प्रार्थना करीत असतात. लालू प्रसाद यादव यांनी तुरुंगाच्या नियमांचे उल्लंघन करीत त्यांच्या रांची येथील बंगल्यावर नवमीच्या दिवशी तीन बोकडांचा बळी दिला.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here