राज्य सरकार देतंय कृषी यांत्रिकीकरणासाठी अनुदान; असा करा अर्ज

मुंबई :

आपला देश कृषिप्रधान आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात बहुतांश जनता शेतकरी आहे. शेतकरी दिवसेदिंवस आधुनिक होत चालला असल्याने त्याला जमिन कसण्यासाठी नवनव्या अवजारांची, यंत्रांची गरज असते. आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना नवनवीन यंत्र आणि अवजारं घेता यावीत म्हणून एक अनुदान योजना आणली आहे.  कृषी यांत्रिकीकरण असे या अनुदान योजनेचे नाव असून राज्य सरकराने  सन २०२०-२१ मध्ये सुरु केली आहे.

जाणून घ्या योजनेची मुद्देसूद माहिती :-

  • रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, हायड्रोलिक पलटी नांगर, ऊस पाचट, कडबा कुट्टी यंत्र, पावर टिलर, विडर मशीन, फवारणी यंत्र, ट्रॅक्टर व ट्रॅक्‍टरचलित विविध प्रकारच्या अवजारांसाठी ही योजना लागू आहे.

सदर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :-

– शेताचा सातबारा उतारा व आठ अ चा उतारा
– संबंधित शेतकऱ्याचे आधार कार्ड( ज्याच्या नावे सातबारा असेल त्याचे कार्ड) – बँकेचे पासबुक
– ट्रॅक्टर अनुदान घ्यायचे असेल तर ट्रॅक्टरचे आरसी बुक
– आवश्यक असल्यास कास्ट सर्टिफिकेट

असा करा अर्ज :-

https://mahadbtmahait.gov.in/farmer/log किंवा https://mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर जाउन अर्ज भरा.

अर्ज भरल्यानंतर मिळालेली पावती सांभाळून ठेवावी. 

 सन २०२० ते २१ करिता शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व इतर प्रकारचे अवजारे घ्यायचे आहेत, अशा शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here