गाई, म्हशी घेण्यासाठी सरकार देतयं १.६० लाखांचे कर्ज; वाचा कसे मिळावयाचे कर्ज

पुणे :

पशु किसान क्रेडिट कार्ड योजना देशातील सर्व राज्यांमध्ये मोठ्या स्तरावर सुरु आहे. अनेक शेतकरी या योजनेचा पुरेपूर फायदा घेत आहेत. या योजनेच्या माध्यमातून जवळपास आतापर्यंत ४.५ लाख पशुपालकांनी अर्ज केले आहेत. सध्या हरियाना सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस लागावे म्हणून ही योजना सुरू केली आहे. म्हैशी, गाय, मेंढी, बकरी आणि कोंबडी पालनासाठी ३ लाखांपर्यंत रक्कम दिली जात आहे.  

राज्य सरकारने जवळपास ८ लाख कार्ड तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पशु किसान कार्ड बनविण्याच्या अटी केंद्र सरकारच्या किसान क्रेडिट कार्डाप्रमाणेच आहेत. यामार्फत शेतकऱ्यांना १ लाख ६० हजार रूपयांपर्यंतचे कर्ज मिळत आहे. तसेच यासाठी कुठल्याही हमीची गरज नाही. पशु किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करू शकता.  

पशु क्रेडिट कार्डसाठी या आहेत पात्रता अटी :- 

१) प्राण्यांचे आरोग्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
२) तुमच्या जवळ असणाऱ्या पशुंचा विमा असणे आवश्यक.
३) कर्ज घेण्यास दिवाणी असावी.
४) तो राज्यातील रहिवाशी असावा.

पशु किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे :-
१) इच्छुक असणाऱ्या पशुपालकांना किंवा शेतकर्‍यांना पशु किसान कार्ड मिळविण्यासाठी बँकेमार्फत केवायसी करावी लागेल.
२) यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदार कार्ड आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे.
३) तुम्हाला बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल.
४) तुम्ही अर्ज केल्यानंतर त्यांची पडताळणी झाल्यानंतर १ महिन्याच्या आत तुमचे पशु किसान क्रेडिट कार्ड तयार केले जाईल.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here