मुंबई :
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक या सदरातून शिवसेना नेते व सामनाचे संपादक संजय राऊत यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर खास ठाकरे शैलीत कौतुक करत फटकारले आहे.
नेमकं काय म्हटलं आहे रोखठोकमध्ये :-
लोकमान्यांनी घरातला गणपती सार्वजनिक केला. जनतेचा उत्सव बनवला तसा दसरा हा पेशवाईनंतर मैदानात साजरा करण्याचे काम दोन प्रमुख हिंदुत्ववादी संघटनांनी केले. पहिले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व दुसरी शिवसेना. पूर्वी राजेरजवाड्यांचे दसरोत्सव होत. त्यात विचार नव्हता. दसरा उत्सवात विचार आणि दिशा देण्याचे काम केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेनेच्या दसरा मेळाव्यांनी. नागपुरात संघाचा आणि मुंबईच्या शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा हा देशात आकर्षणाचा विषय ठरला. शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या अनेक लढायांच्या सिंहगर्जना दसरा मेळाव्यात केल्या, तशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागपूरच्या दसरा मेळाव्यांतून राष्ट्रीय विचारांना चालना दिली. आजही ती दिली जाते.
दसऱ्याचा उत्सव म्हणजे प्रसन्नता. सीमोल्लंघन आता पूर्वीसारखे राहिले नाही. कारण आपट्याची पाने लुटण्यात नव्या पिढीस रस उरला नाही. देश लुटण्याचे सीमोल्लंघन सदासर्वकाळ सुरूच असते तेथे आपट्याच्या पानास कोण विचारणार! दसऱ्याच्या उत्सवात आजही पालख्या निघतात, सोने लुटतात, पण शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात विचारांचे सोने जनतेवर उधळणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कोठे आहेत? सोने लुटताना तोफगोळे सोडणारे, विरोधकांच्या गंडस्थळावर हल्ला करून दाणादाण उडवणारे बाळासाहेब ठाकरे हे ज्यांनी शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात पाहिले आहेत, त्यांनाच सीमोल्लंघन कशाला म्हणतात ते कळेल.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
- त्यामध्ये भारताची फ़क़्त ओएनजीसी; युरोप व अरबस्तानातील दहा कंपन्यांचा वाटा 45 टक्के.!
- पांढरेच नाही तर रंगीतही सोने; पुन्हा फुलणार भारतात रंग, पहा नेमके काय संशोधन झालेय ते
- पुणे, वडूज, सांगलीत ज्वारीने खाल्लाय भाव; वाचा महाराष्ट्रात कुठे व किती आहे भाव
- टोमॅटो मार्केट अपडेट : पहा, आजचे ताजे बाजारभाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा, आजचे लाल व उन्हाळचे भाव