मुलांचा डेटा चोरणारे ‘हे’ 3 अ‍ॅप्स प्लेस्टोरवरुन हटवले; तात्काळ करा डिलीट

दिल्ली :

आजकाल लहान मुले मोबाईल वापरतात. विविध अ‍ॅप्स सराईतपणे हाताळतात. कधी कधी आपली वैयक्तिक माहितीसुद्धा तिथे भरतात. मनोरंजनासह अभ्यास या संकल्पनेवर आधारित अनेक अ‍ॅप्स सध्या मार्केटमध्ये लौन्च होत आहेत. सध्या मुलांच्या अ‍ॅप्सबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मुलाचा डेटा चोरी करत असल्याचा आरोप करत गुगलने प्ले स्टोअरवरून आणखी तीन अ‍ॅप्सला हटवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे तीन अ‍ॅप्स मुलांचा डेटा कलेक्ट करीत होते तसेच गुगल प्ले स्टोरवरील नियमांचे उल्लंघन करीत होते. गुगलने Princess salon, number coloring आणि Cats & Cosplay हे तीन अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोरवरुन हटवले आहेत.

आम्ही कन्फर्म केले आहे की रिपोर्टमध्ये असलेल्या अ‍ॅप्सला हटवले आहे. ज्यावेळी कोणत्याही अ‍ॅप्सला चालवले जाते आणि ते जर का नियमांचे उल्लंघन करीत असेल तर आम्ही अशा अ‍ॅप्सवर कारवाई करतो, अशी माहिती गुगलच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

गुगलच्या प्ले स्टोरवर येण्यापूर्वी सिक्युरिटी तपासावी लागते. मात्र, यानंतरही अनेक अ‍ॅप्स या ठिकाणी पोहोचतात. त्यानंतर युजर्सना नुकसान पोहोचवले जाते. गुगलला अशा अ‍ॅप्शविषयी माहिती होताच गुगल प्ले स्टोरवरुन हटवले जाते.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here