बाबो… एकदा चार्ज केल्यावर हिरो कंपनीची स्कूटर चालते 200 किलोमीटर; जाणून घ्या किंमत

दिल्ली :

प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पैशांची बचत करण्यासाठी लोकांचा ओढा इलेक्ट्रिक स्कूटर्सकडे असल्याचे गेल्या काही महिन्यांमध्ये दिसून आले आहे. सध्या शहरसह ग्रामीण भागातही इलेक्ट्रिक स्कूटर्स मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहेत. अशातच हीरो इलेक्ट्रिकनेही आपली एक भन्नाट मायलेज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली आहे. ही गाडी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 200 किमीहून अधिक Average देते. विशेष म्हणजे या गाडीची किंमतही रेगुलर गाड्यांइतकीच आहे. या भन्नाट फीचर्स असलेल्या स्कूटरची दिल्ली शोरूममध्ये सुरूवातीची किंमत 64 हजार 640 रुपये आहे.  

ग्राहक आपल्या बिजनेसच्या हिशोबानुसार या स्कूटरला कस्टमाइज करू शकतात. कंपनीने स्कूटरला कस्टमाइज करण्यासाठी आइस बॉक्स आणि स्प्लिट सीट्सचा ऑप्शन दिला आहे. मार्केटमध्ये या इलेक्ट्रिक स्कूटरची तुलना बजाजच्या इलेक्ट्रिक स्कूटर चेतकशी होईल, अशी माहिती हीरो इलेक्ट्रिकने दिली आहे.

अशी आहेत या स्कूटरची वैशिष्ट्ये :-

  • ब्लूटूथ इंटरफेसद्वारे ऑन-डिमांड कनेक्टिव्हिटीसाठी चार लेवल
  • स्कूटरला ट्रॅक करण्याचीही सुविधा
  • 0.6 kW इलेक्ट्रिक मोटर
  • टॉप स्पीड ताशी 42 किलोमीटर आहे.
  • 1.536 kWh बॅटरी पॅक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here