गरम पदार्थ खाताना तोंड भाजलं तर त्यावर ‘हे’ आहेत घरगुती उपाय

आजकाल असे बरेच पदार्थ असतात की जे फक्त गरमागरम खायलाच भारी लागतात, असे पदार्थ खाताना किंवा कधी कधी पदार्थ किती गरम आहे याचा अंदाज न आल्याने आपले तोंड भाजते. नंतर त्याच्या जखमा होतात. तसे पहिले तर तोंडातील जखमा लाळेमुळे लवकर भरून येतात. परंतु तोंडातील भाग नाजूक आणि संवेदनशील असल्यामुळे त्या जखमा सारख्या जाणवत असतात. आपले तोंड भाजले तर नेमकं काय करायचं हे आपल्याला माहिती नसत. म्हणूनच आज आम्ही आपल्याला तोंड भाजल्यावर तर त्यावर कोणते घरगुती उपाय करायचे याविषयी सांगणार आहोत.

हे आहेत उपाय :-

१) मधासारख्या गोड, पातळ आणि औषधी पदार्थांमुळे तुमच्या जीभ आणि टाळूवर एक आवरण निर्माण होते. शिवाय मधामधील अॅंटि मायक्रोबायल घटकांमुळे तुमच्या तोंडामधील जखम बरी होणे सोपे जाते.

२) थंडगार दही खा अथवा दूध प्या. ज्यामुळे तोंडाचा दाह कमी होण्यास मदत होईल. चटका बसल्यामुळे तोंडात होणारी जळजळ आणि खास यामुळे कमी होऊ शकेल.

३) पुदिना असलेल्या मिंटच्या गोळ्या खा. कारण या थंड असतात आणि यामुळे तुम्हाला इनफेक्शन होण्याचा धोका कमी होतो.

४) संशोधनानुसार तोंडातील पोळलेल्या भागावर थंड पाणी पिण्याने लवकर परिणाम होतो. दहा मिनीटे थंड पाण्याचा असा शेक मिळाला की भाजलेल्या भागाला थंडावा मिळतो.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here