अन्न चावून खा… अन्यथा भोगावे लागतील ‘हे’ परिणाम

आपण अनेकदा अन्न चावून खात नाही. कधी कधी आपल्याला घाई असते म्हणून वेळेत जेवण उरकायचं असत म्हणून… तर कधी कधी ब्रेड आणि तत्सम पदार्थ समोर असतात जे खाताना जास्त चावायची गरज पडत नाही, असे आपल्याला वाटत. आपल्यापैकी अनेकांना भातही नीट चावून खायची सवय नसेल. पण लक्षात घ्या तुम्ही अन्न चावून नाही खाल्ले तर तुम्हाला आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागेल.

हे होतील दुष्परिणाम :-

१) सगळ्यात आधी जो त्रास जाणवू लागेल तो आहे अपचनाचा.  पोट सतत भरल्यासारखे वाटत असेल आणि तुम्हाला सतत ढेकर येत असतील तर समजून घ्या तुम्ही जेवण हळूहळू खावे आणि निट चावून खावे.

२) अन्न नीट चावले नाही तर ते पचण्यास जड होते. जर ते अन्न पचलेले नसेल तर ते पोटातून बाहेर जाण्यासही अडथळा निर्माण करते. बद्धकोष्ठतेचा त्रास तुम्हाला सातत्याने होत असेल तर तुम्ही तुमचे अन्न नीट चावत आहात की नाही याकडे लक्ष द्या.

३) पोटाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पचनशक्ती चांगली राहणे गरजेचे असते. जर तुम्ही योग्य पद्धतीने अन्न ग्रहण केले नाही तर तुमच्या पचनशक्तीवर ताण येतो. एकदा पचनशक्तीवर ताण आला तर मात्र तुम्हाला ती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात

४) अन्न चावून खाण्याचे काही फायदे आहेत. अन्न चावल्यामुळे तुमच्या तोंडाचा व्यायाम होतो. दात मजबूत होण्यास मदत मिळते. शिवाय अन्न चावल्यामुळे तुमच्या कॅलरीजही वापरल्या जातात.       

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here