असे बनवा साबुदाणा वडा अप्पे; रेसिपी वाचा एका क्लिकवर

आम्ही नेहमीच विविध नवनवीन पदार्थ आपल्या भेटीला घेऊन येत असतो. सध्या सगळीकडे उपवास चालू आहेत. अशातच उपवास न करणाऱ्यांसाठी वेगळे जेवण बनवावे लागत आहे. म्हणून आज आम्ही आपल्यासमोर साबुदाण्याचा एक मस्त आणि टेस्टी प्रकार घेऊन आलो आहोत. आज आपण साबुदाणा वडा अप्पे कसे बनवायचे हे जाणून घेवूया

साहित्य घ्या मंडळी…

  1. 1 वाटी साबुदाणा
  2. 1 उकडलेले बटाटा
  3. 2 टेबलस्पून दाण्याचा कूट
  4. 2 हिरव्या मिरच्या
  5. 1 टिस्पून जिरे पावडर
  6. १ टेबलस्पुन तुप
  7. 1/2 टिस्पून शेंदेमीठ

साहित्य घेतलं असेल तर वाट कसली बघताय वाचा कृती आणि लागा बनवायला

  1. एक वाटी साबुदाणा दोन तास भिजत घालावा. साबुदाणा भिजला कि एका बाऊलमध्ये भिजलेला साबूदाणा उकडलेला बटाटा बारीक चुरून घ्या. आता त्यात दाण्याचा कूट, हिरवी मिरची चिरलेली, जिरे पावडर, मीठ हे सर्व घाला.
  2. आता वरील मिश्रण सर्व व्यवस्थित गोळा होईतोपर्यंत भिजवून घ्या.आता अप्पे पात्राला तूप लावा वरील मिश्रणाचे गोळे करून आप्पेपात्रात शिजायला ठेवा.
  3. आता त्यावर झाकण ठेवून एक बाजू शिजवून घ्या. आता वड्याना तुप लावून दुसरी बाजू भाजून घ्या. आणि गरम गरम अप्पे चटणीबरोबर सर्व्ह करा.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here