अहमदनगरमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षेचा पेपर व्हॉट्सॲपवर व्हायरल; ‘या’ कॉलेजमध्ये घडला प्रकार

अहमदनगर : 

सध्या काही विद्यार्थी ऑनलाईन पेपर देत आहेत तर काही विद्यार्थ्यांचे ऑफलाईन पद्धतीने पेपर घेतले जाणार आहेत. अनेक शाखांचे पेपर चालू असताना एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा पेपर सुरु होताच काही वेळातच सदर पेपर व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याची मोठी घटना समोर आली आहे.

या प्रकरणात तीन विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. या प्रकरणावरून चौघांवरही भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी बुऱ्हाणनगर येथील बाणेर कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य विजय मच्छिंद्र जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात आणखी काही विद्यार्थी असू शकतात, असेही म्हटले जात आहे.    

वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा कॉस्ट अँड वर्क अकाऊंटचा शुक्रवारी पेपर आयोजित केला होता. सकाळी या परीक्षेच्या पेपरला सुरुवात झाली. हा पेपरचे वाटप करण्यात आल्यानतंर लगेचच तो एका विद्यार्थिनीने व्हाट्सॲपवर शेअर केला. त्यानुसार शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी तपासासाठी पथके रवाना केली आहे

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here