धक्कादायक : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण; केले ‘हे’ आवाहन

मुंबई :

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटले की, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.

पुढे त्यांनी ‘माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी’, असे आवाहनही केले आहे. त्यांना नेमकी कोरोनाची लागण कुठे झाली, हे मात्र अद्यापही समोर आलेले नाही. फडणवीस हे गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात दौरे करत होते. त्याचबरोबर बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारीही भाजपानं त्यांच्यावर सोपवलेली असल्यानं बिहारमध्येही ते सातत्यानं फिरतीवर होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही सध्या घरातूनच काम पाहत आहेत. त्यांनाही कोरोनाची काही लक्षणे जाणवली होती.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here