संतप्त संजय राऊतांची मागणी; ‘या’ बाईवर तात्काळ कारवाई करा

मुंबई :

सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एक बाई ट्रॅफिक  पोलीस हवालदाराला मारहाण करताना दिसत आहे. तसेच तिने त्याला धक्काबुक्की करत शिव्याही दिल्या आहेत. या धक्काबुक्कीत पोलिसाचे कपडे सुद्धा फाटलेले या व्हिडीओत दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी संबंधित महिलेवर कारवाईची मागणी केली आहे.

त्यांनी म्हटले की, या बाईवर तात्काळ कारवाई करायलाच हवी. मुंबई पोलिसांच्या सन्मानाचा विषय आहे. मुंबईतील काळबादेवी परिसरात ट्रॅफिक हवालदाराने एका महिलेने वाहतुकीचे नियम मोडले म्हणून कारवाई केली. या कारवाईदरम्यान त्या हवालदाराने आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा दावा त्या महिलेने केला आहे. या व्हिडीओत महिला आणि तिच्या साथीदाराकडून वारंवार शिवीगाळ का केली? असा जाब विचारला आहे. त्यानंतर त्या महिलेने या व्हिडीओत हवालदाराची कॉलर पकडत मारहाण केली. तसेच त्या हवालदाराचे कपडेही फाडले. याप्रकरणी L. T. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे. या आरोपींवर कलम 571/2020 IPC 353, 332, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे.     

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here