राऊतांचे दोन ‘ब्रँड’ ‘या’ कार्यक्रमासाठी येणार एकत्र, राऊतांसह पवार- ठाकरे एकाच मंचावर…

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखाच्या माध्यमातून संजय राऊत यांनी ‘’ठाकरे आणि पवार हे महाराष्ट्रातील दोन ब्रँड आहेत’, असे म्हटले होते. यापूर्वी २०१७ मध्ये एकाच मंचावर दिसलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता पुन्हा एकाच मंचावर दिसणार आहेत. ‘चौकात उधळले मोती’ या अंबरिश मिश्र लिखित पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. 

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे. शरद पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि राज ठाकरे यांना विशेष पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. जोरदार वक्ते असलेले तीन वेगवेगळ्या पक्षाचे नेते असे एकत्र येणार म्हटल्यावर त्यांच्यात कुठल्या विषयावर संवाद होणार? ते भाषणात काय बोलणार?, याची चर्चा सगळीकडे चालू आहे.

२०१७ ची ती मुलाखत प्रचंड गाजली होती. शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला 50 वर्षे पूर्ण झाली आणि त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने पुण्यातील बीएमसीसी कॉलेजच्या मैदानावर या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज ठाकरेंच्या प्रश्नांच्या चेंडूंवर पवारांनी तूफान फटकेबाजी केली होती. आता या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.    

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here