खासदार डॉ.अमोल कोल्हेंच्या ‘शिवगंध’ ग्रंथाचे शरद पवारांच्या हस्ते प्रकाशन; वाचा, पुस्तकाविषयी

मुंबई :

शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे अभिनेतेही आहेत. छत्रपती शिवरायांची भूमिका साकारल्यामुळे ते घराघरात पोहोचले. नुकतेच त्यांच्या ‘शिवगंध’ या ग्रंथाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे याही उपस्थित होते. याविषयीची सर्व माहिती कोल्हेंनी फेसबुक पोस्ट करत दिली.

नेमकं काय म्हटलं आहे डॉ. कोल्हेंनी फेसबुक पोस्टमध्ये :-

कोणत्याही अभिनेत्याने साकारलेली भूमिका त्याला खुप काही देऊन जाते. जर ती भूमिका युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांची असेल तर अभिनेत्याच्या कलाप्रवासाचं सोनं होतं.आई जगदंबेच्या कृपेने ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेत मला शिवरायांची भूमिका साकारण्याचं भाग्य लाभलं. आयुष्याचं सार्थक झालं. या भूमिकेनं मला खुप काही दिलं. एका उत्तुंग व्यक्तिमत्वाला छोट्या पडद्यावर साकारणं ही खुप मोठी जबाबदारी होती.मला ते भाग्य मिळालं,हा माझा बहुमान आहे.

या भूमिकेने मला कलाकार म्हणून समृद्ध तर केलंच पण आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देखील दिला. या सर्व अनुभवांचे संकलन असणारा ‘शिवगंध’ हा ग्रंथ आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या हस्ते दसऱ्याच्या पुर्वसंध्येला ऑनलाईन प्रकाशित झाला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे  ताई देखील उपस्थित होत्या. आदरणीय पवार साहेबांनी अगदी आवर्जून यासाठी वेळ दिला व पुस्तकांसाठी माझे अभिनंदन केले.

साहेबांनी केलेल्या कौतुकामुळे भारावून गेलो आहे. या पुस्तकासाठी डॉ नितीन आरेकर यांनी शब्दांकन, डिंपल प्रकाशनाने ते प्रकाशित केले आहे.आदरणीय साहेब व सुप्रियाताई व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून या कार्यक्रमात सहभागी झाले व आपण सर्वांनीही ऑनलाईन उपस्थिती लावली, याबद्दल मनापासून आभार.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here