संतप्त खड्सेंचा सवाल; ‘त्यांना’ काय चॉकलेट देवून आणलं आहे का?

मुंबई :

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकला असून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील आणि खडसे यांच्या शाब्दिक चकमक चालू आहे. ‘समाधान लिमलेटच्या गोळीनं होतं आणि कॅडबरीनंसुद्धा होतं. यातलं खडसेंना काय मिळतं, ते पाहावं लागेल’, असे म्हणत पाटील यांनी खडसेंना डिवचले होते. यावरून भाजपामध्ये मोठ्या संख्येनं लोक आलेत. प्रविण दरेकर आणि राधाकृष्ण विखे यांना काय चॉकलेट देवून आणलं आहे का? असा थेट सवाल खडसेंनी विचारला आहे.

पुढे बोलताना खडसे म्हणाले की, मी जाणार हे गोपीनाथ गडावरच स्पष्ट झालं होतं. त्यावेळी मला थांबवण्यासाठी का आग्रह केला नाही? मला थांबण्यासाठी कुणाचा फोन आला नाही. एकदा चंद्रकांतदादा पाटलांचा फोन आला होता. पण, त्यांना माझी गरज वाटली नाही त्यामुळे त्यांनी फार आग्रह केला नाही.

‘माझ्यासोबत निवडून आलेले किती लोक येत आहेत हे महत्वाचे नाही, किती लोक निवडून आणू शकतो हे महत्वाचे आहे. सध्यातरी माझ्यासोबत पदावर असलेले कुठले आमदार, खासदार पक्षात येणार नाहीत. मात्र 10-12 माजी आमदार राष्ट्रवादीचे काम करतील’, असेही यावेळी खडसेंनी स्पष्ट केले.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here