म्हणून माझ्यावर कारवाई करावी; शिवसेना आमदाराने आणलेल्या हक्कभंग प्रस्तावानंतर खासदार तटकरेंची भूमिका

मुंबई :

माझ्यामुळे राज्यातल्या सरकारमध्ये समज- गैरसमज जाऊ नये म्हणून माझ्याविरोधात दाखल झालेला हक्कभंग स्वीकृत करावा, अशी विनंती मी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना करणार आहे. घटनेनुसार खासदार म्हणून मला बैठक बोलावता येतं का हेही तपासावे, महाविकास आघाडीचं सरकार टिकावं म्हणून माझ्यावर कारवाई करावी, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते व खासदार सुनील तटकरे यांनी घेतली आहे.

12 ऑक्टोबरला तटकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम एक कार्यक्रम झाला होता. यानंतर दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी ‘रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे हे दापोली विधानसभा मतदारसंघात होणार्‍या विकासकामांच्या भूमिपूजनाला आपणास निमंत्रण देत नाहीत. तसेच आपल्याला विश्‍वासात न घेता कार्यक्रम करत’, असल्याची तक्रार करत खासदार तटकरे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे.

सध्या राज्यभरात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच नेत्यांमध्ये कायमच धुसफूस होत असल्याचे दिसते. वरिष्ठ पातळीवर मविआ सरकार टिकेल मात्र स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना कसे सांभाळणार असा प्रश्न मविआ नेत्यांसमोर आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here