मिरा भाईंदरमध्ये भाजपला धक्का; ‘या’ आमदाराच्या हाती शिवबंधन

मुंबई :

एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ भाजपचे किती नेते पक्षबदल करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. ४० वर्षे भाजपमध्ये काढलेल्या खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये केलेल्या पक्षप्रवेशामुळे राज्याच्या राजकारणाची समीकरणे बदललेली आहेत. अशातच भाजपला अजून एक धक्का बसला आहे. भाजपच्या सहयोगी राहिलेल्या गीता जैन यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. आज त्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवबंधन हाती बांधले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार गीता जैन यांनी एकट्यानेच शिवसेनेत प्रवेश केलाअसला तरी भाजपचे नगरसेवक मॉरिस रॉड्रिक्स, अश्विन कसोदरिया, परशुराम म्हात्रे आणि विजय राव आणि जवळपास 10 नगरसेवक गीता जैन यांच्या संपर्कात  आहेत.

का सोडली भाजपची साथ :-

बंडखोरी केल्यावर गीता जैन निवडून आल्या. त्यावेळी त्यांनी भाजपला समर्थन दिलं होतं. त्यांना अपेक्षा होती की, मिरा भाईंदरची कमान भाजप आपल्या हातात देईल. मात्र स्थानिक भाजप कुठल्याही कार्यक्रमात आमंत्रण देत नसल्याच्या कारणावरुन गीता जैन नाराज होत्या. त्यानंतर त्यांनी थेट शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

यानंतर आता मिरा भाईंदरमध्ये जैन समाजाची संख्या जास्त असल्याने येणाऱ्या काळात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. तसेच मिरा भाईंदर मनपामध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र शिवसेना, कॉंग्रेस आणि जैन यांनी आणलेले नगरसेवक एकत्र झाल्यास भाजपची सत्तेला मनपामध्ये धक्का बसू शकतो.   

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here