रोहित पवारांनी एक वर्षात ‘त्या’ गोष्टी इकडे आणून विकल्या; राम शिंदेची जळजळीत टीका

अहमदनगर :

आजच्याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारी निवडणूक झाली. मागविकास आघाडी सरकारलाही आजच्याच दिवशी वर्ष पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप उपाध्यक्ष राम शिंदे यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला. ‘कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी या एक वर्षात फक्त कोंबड्यांची पिल्लं, मासे आणि बी बियाणे इकडे आणून विकली’, अशी जळजळीत टीका शिंदे यांनी केली.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की,`बारामती पॅटर्न राबवू, म्हणाले मात्र याबाबत जनतेची घोर निराशा झाली असून, कर्जतमधील विकासाची घोडदौड थांबली आहे. वर्षभराचा लेखाजोखा पाहता कर्जत- जामखेडमधील विकासाचे नवे पर्व अपयशी ठरले असल्याचेही पुढे शिंदे यांनी सांगितले.

निवडणुकीत बारामती पॅटर्नची खूप चर्चा झाली. मात्र, एक वर्षानंतरही कर्जत काहीच विकास झाला नाही ‘ त्यामुळे बारामती पॅटर्न सपशेल अपयशी ठरला असुन लोकांची घोर निराशा झाली असल्याचा आरोपहे शिंदे यांनी केला. आता या टीकेला संयमी आणि अभ्यासू म्हणून परिचित असलेले आमदार रोहित पवार कसे उत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.    

संपादन: विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here