एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट; अनेकांना भाजपा सोडण्याची इच्छा, परंतु…

मुंबई :

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकला असून काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्यानंतर अनेक समीकरण बदलताना पाहायला मिळत आहेत. आज माध्यमांशी बोलताना खडसे यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे. ‘अनेकांना भाजपा सोडण्याची इच्छा आहे. परंतु, त्यांना राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याचे सांगून थांबविण्यात येत आहे’, असे खडसे यांनी सांगितले आहे. यावेळी ‘मात्र, राज्य सरकार पडणार नाही’, असा खमका विश्वास खडसे यांनी व्यक्त केला आहे.

काल राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसेंसोबत त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनीही भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here