हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नसलेल्या मुख्यमंत्र्यांना अखेर प्रमाणपत्र मिळाले; ‘या’ भाजप नेत्याची खोचक टीका

मुंबई :

काही दिवसांपूर्वी मंदिरे उघडण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित विविध मुद्द्यांवरून भाष्य केले होते. तसेच हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना डिवचले होते. यानंतरही मुख्यमंत्री ठाकरे आपल्या भुमिकेवर ठाम राहिले. त्यांच्या या निर्णयाचे राज्यातील बुद्धीजीवी वर्गाने स्वागत केले. याच पार्श्वभूमीवर ‘हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नसलेल्या मुख्यमंत्र्यांना अखेर प्रमाणपत्र मिळाले, असे म्हणत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली.

भातखळकर म्हणाले की, हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नसलेल्या मुख्यमंत्र्यांना अखेर प्रमाणपत्र मिळाले, आयुष्यभर शिवसेनाप्रमुखांना पाण्यात पाहणाऱ्या डाव्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मंदिरे बंद ठेवण्याच्या अभूतपूर्व कामगिरीसाठी निधर्मीपणाचे प्रमाणपत्र जारी केलेले आहे.

नेमकं काय म्हणाले होते राज्यपाल :-

have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? 

त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेले उत्तर :-

माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही.

यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे, शांता गोखले, रंगनाथ पठारे आणि इतर अनेक साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तब्बल २ हजार व्यक्तींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित त्यांच्या या भूमिकेचे स्वागत केले होते.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here