बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना काँग्रेसने विचारले ‘हे’ ८ महत्त्वाचे प्रश्न; वाचा काय आहेत ते

पटना :

देशाच्या राजकीय पटलावर बिहार निवडणूक आणि त्याअनुषंगाने येणार मुद्दे चर्चेत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने बिहारी जनतेला दिलेल्या आश्वासनांवरून वाद निर्माण झाले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणावरून काँग्रेसने त्यांच्यावर हल्लाबोल करत मोदी खोटं बोल असल्याची टीका केली. तसेच त्यांना १० प्रश्नांची उत्तरे द्यावी, असे म्हटले आहे.

हे आहेत प्रश्न :-

केंद्र सरकार बिहारला विशेष राज्याचा दर्जा का देत नाही

ऊजार्मंत्री आर. के. सिंह यांनी बिहारच्या या मागणीला फेटाळून का लावले, त्यांची ही भूमिका तुम्हालाही मान्य आहे का? 

गेल्या निवडणुकीत ५०० कोटी गुंतवणुकीतून भागलपूरमध्ये केंद्रीय विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा झाली होती त्याचे काय झाले?

बिहारला खोटी आश्वासने का? २०१५ मध्ये कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली होती त्याचे काय झाले?

बक्सरच्या चौसात १० हजार कोटी रुपये गुंतवणुकीतून होणाऱ्या १३०० मेगावॅट थर्मल पॉवर प्लांटचे पुढे काय झाले?

मनिहारी ते साहिदगंज पूल का? नाही? बनला? कारण त्याची घोषणा तर स्वत:च पंतप्रधान मोदींनी केली होती.

चार हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा चार पदरी रस्ता का तयार झाला नाही?

तुमची आश्वासने खोटी का? 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here