मुलीच्या लग्नावर केला होता ४८५ कोटी रुपयांचा खर्च; ‘हे’ मोठे श्रीमंत उद्योगपती ठरले दिवाळखोर

लंडन :

कोरोनामुळे जगभरातील व्यवसाय, उद्योगपती यांची आर्थिक स्थिती ढासळलेली आहे. सवर्सामान्य लोकांपासून तर मोठमोठ्या कंपन्या आर्थिक संकटात सापडलेल्या आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. ब्रिटनमधील १९व्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती व स्टीलकिंग लक्ष्मी मित्तल यांचे भाऊ प्रमोद मित्तल हे त्या देशातील सर्वात मोठे दिवाळखोर व्यक्ती ठरले आहेत. त्यांच्यावर सध्या २५४ कोटी पौंडचे कर्ज आहे.

या लोकांकडून त्यांनी घेतले आहे कर्ज :-

९४ वर्षीय वडिलांकडून घेतलेल्या १७ कोटी पौंड 

आपली पत्नी संगीताकडून ११ लाख पौंड

३० वर्षे वयाचा पुत्र दिव्येशकडून २४ लाख पौंड

मेव्हणा अमित लोहिया याच्याकडून ११ लाख पौंड

ब्रिटनच्या दिवाळखोरीविषयक खटले चालविणाऱ्या न्यायालयाने ६४ वर्षे वयाच्या प्रमोद मित्तल यांना दिवाळखोर घोषित केले आहे. प्रमोद मित्तल हे अफाट खर्च करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या मुलीच्या लग्नावर सुमारे ४८५ कोटी रुपये खर्च करणाऱ्या प्रमोद मित्तल यांच्यावर आता ही बिकट स्थिती ओढवली आहे. प्रमोद मित्तल हे बोस्नियातील ग्लोबल इस्पात कोकस्ना इंडस्ट्रीज (गिकिल) या कंपनीने घेतलेल्या कर्जासाठी वैयक्तिक हमी दिली होती. सुमारे १६.६ कोटी डॉलरचे घेतलेले कर्ज फेडण्यास गिकिल अपयशी ठरल्यामुळे प्रमोद मित्तल यांचे वाईट दिवस सुरू झाले.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here