‘तो’ शब्द नाथाभाऊंनी जाहीरपणे दिला आहे : शरद पवार

मुंबई :

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकला असून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी कार्यक्रमात बोलत असताना शरद पवार म्हणाले की, ता पक्षबांधणीला खऱ्या अर्थाने गती यायची असेल तर आज नाथाभाऊंच्या पक्षात येण्याने ती गती येईल यात शंका नाही. जळगाव जिल्हा हा पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विचाराने चालेल हा शब्द नाथाभाऊंनी जाहीरपणे दिला आहे.

पुढे पवारांनी स्पष्ट केले की, सबंध महाराष्ट्रातील संघटनेचा विचार केल्यास नवी पिढी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्यास उत्सुक आहे, असे दिसते. दिवसेंदिवस पक्षाची शक्ती वाढत आहे. पण कोणत्या भागात पक्षसंघटनेचे काम अधिक जोमाने वाढायला हवे, असा विचार केल्यास खान्देशचा भाग नजरेसमोर येतो.

नाथाभाऊंनी पक्षात येताना कोणतीही अपेक्षा ठेवली नाही. केवळ सामान्य माणसाशी बांधिलकी जपण्याची भूमिका त्यांनी मांडली. प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश संघटना काम करतेय. त्याला नाथाभाऊंची जोड मिळाल्यास प्रत्येक सामान्य माणसासाठी काम करण्यास पक्षास बळकटी मिळेल, असेही पुढे बोलताना पवारांनी स्पष्ट केले.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here