तो बाप असतो; वडिलांवरील ‘ही’ कविता वाचून डोळ्यात येईल पाणी


तो बाप असतो
बाळंतपण झाल्यावर, धावपळ करतो
औषध देतो, चहा, कॉफी आणतो
पैश्याची जुळवाजुळव करतो… तो बाप असतो

सगळ्यांना ने आण करतो
स्वयंपाकही करतो
सिजरीन नंतर बायकोला त्रास नको
म्हणून बाळ रडलं तर रात्र भर जागतो… तो बाप असतो
चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो

डोनेशन साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
कॉलेज मध्ये सोबत जातो, होस्टेल शोधतो
स्वतः फाट्क बनियन घालून तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो… तो बाप असतो

स्वतः टपरा मोबाईल वापरून,तुम्हाला भारीतला मोबाईल घेऊन
देतो तुमच्या प्रीपेड चे पैसे स्वतःच भरतो
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो… तो बाप असतो

love marriage करायला कोणी निघाल तर खूप चिडतो
“सगळ नीट पाहिलं का?” म्हणून खूप ओरडतो
“बाबा तुम्हाला काही समजत का? “अस ऐकल्यावर खूप रडतो… तो बाप असतो
जाताना पोरगी सासरी, धाय मोकळून रडतो
माझ्या चिऊला नीट ठेवा असे हात जोडून सांगतो… तो बाप असतो 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here