महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.लं. चे काही अफलातून किस्से; वाचा आणि पोटभर हसा

१) एकदा आपली आणी सुनिताबाईंची ओळख करुन देताना पु.लं. म्हणाले की “मी ‘देशपांडे’ आणी ह्या ‘उपदेशपांडे”

२) एकदा एक भोजन समारंभात पु.लं. च्या एक बाजुला श्रि ना.ग. गोरे आणि दुस-या बाजुला श्रि भुजंगराव कुलकर्णी बसले होते. पु.लं. म्हणाले, “आफतच आहे. एकिकडे नाग आहे तर दुसरीकडे भुजंग! !!”

३) एकदा पु.लं. ना एक कुकरी सेट गिफ्ट म्हणुन मीळाला. तो सेट सुनिता देशपांडे आपल्या भाचीला दाखवत होत्या.
सुनिताबाईंचा ‘सर्व काही जपुन ठेवण्याचा ” स्वभाव माहित असल्यामुळे भाची सुनिताबाईंना म्हणाली
” अगं, एवढा सुदंर सेट फुटु नये या भितीने तु तो कधी वापरणारच नाहीस का?”
त्यावर पु.लं. पटकन म्हणाले “हो तर !! सुनीता मला कधी ओमलेट सुद्धा करुन देत नाही … अंडी फुटतील म्हणुन !!!”

४) पु.लं. चा वाढदिवस होता,
एका मार्केट यार्डाच्या व्यापारी चाहत्याने त्यांच्या गळ्यात सफरचंदाचा हार घातला.
पु.लं. त्या वजनाने थोडे झुकले.

हे बघुन व्यापारी म्हणाला “काय राव, काय झाले येवढे”?

पु.लं. म्हणाले, “बरे झाले तुम्ही नारळाचे व्यापारी नाही”

५) एकदा पु.लं. प्रवासात असताना त्यानां कोणीतरी भेटला,
तो त्याचां चाहता होता. तो म्हणाला की

माझी फक्त दोन व्यक्ती वर श्रद्धा आहे, एक ञानेश्वर आणी दुसरे तुम्ही.

माझ्या खोलीत मी ञानेश्वरा च्या फोटो समोर तुमचा ही फोटो ठेवलाय.

तर पु.लं. म्हणाले “अहो असं काही करु नका नहीतर लोक विचारतील, ञानेश्वरानी ज्याच्या कडुन वेद म्हणुन घेतले तो रेडा हाच का म्हणुन?”

६) पुलं एकदा चितळ्यांच्या दुकानात गेले, मिठाई खरेदी केली आणि खोक्यात बांधून द्यायला सांगीतले. दुकानातील व्यक्ती म्हणाली “खोक्याचा चार्ज पडेल”. त्यावर पुलं म्हणाले (म्हणे), “अरे वा, म्हणजे मिठाई फुकट?”

७) स्वत:च्या खास विनोदी पध्द्तीत पु.ल.एके ठिकाणी म्हणतात,” मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार ? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आड्वळणी व्याख्या आहे”

८) एकदा एक ‘कदम’ नावाचे गृहस्थ पु लं कडे मुलगा झाल्याचे पेढे घेऊन आले…..पु लं नि आशीर्वाद दिला …….
‘कदम कदम बढाये जा

९) एका सगींत संमेलनाच्या भाषणात पु.ल. नी एक किस्सा सांगितला होता. ’एकदा एका शेताच्या बांधावरुन जात असताना एक शेतकरी शेतात काहीतरी काम करताना दिसला. आम्हा लेखकांना कुठे गप्पा केल्याशीवाय राहवत नाही. त्या स्वभावानुसार मी त्या शेतकराला विचारलं “काय हो शेतकरी बुवा, या झाडाला कोणते खत घातले तर त्याला चांगले टॉमेटो येतील?” त्यावर तो शेतकरी चटकन म्हणाला “या झाडाला माझ्या हाडांचे खत जरी घातलेत तरी त्याला टॉमेटो कधीच येणार नाहीत कारण ते झाड वांग्याचे आहे।”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here