‘त्यांनी ED लावली तर मी CD लावेन’; खड्सेंचा ‘त्यांना’ इशारा

मुंबई :

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकला असून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्यानंतर अनेक समीकरण बदलताना पाहायला मिळत आहेत. भाजप नेते एकनाथ खडसे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होत आहे. यावेळी तुम्ही भाजपविरोधात बंड पुकारलंत तर तुमच्या मागे ED ची वगैरे कारवाई लावतील, असं पाटील म्हणाले होते. पण त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजपला इशारा दिला आहे.

पुढे बोलताना ‘सकाळी पाच वाजता शपथविधी घेतला तेव्हा नीतिमत्ता कुठे होती. तेव्हा राष्ट्रवादी चांगला वाटलं होता ना?’, असे म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता टोला हाणला.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसेंसोबत त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनीही भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here