मधूमेहींसाठी ‘हे’ ५ सुकामेव्याचे पदार्थ आहेत फायदेशीर; जाणून घ्या कोणते

बदलती जीवनशैली, खानपानाच्या पद्धती, व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे तरुणाई आरोग्याच्या समस्यांच्या विळख्यात सापडली आहे. त्यामुळे लठ्ठपणा वाढत चालला आहे परिणामी मधुमेह आणि रक्तदाबाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भारतात मधुमेहाचे रुग्ण सर्रास दिसून येतात. मधुमेह म्हटल्यावर खायचं बंधन येतं. त्यामुळे अवेळी भूक लागल्यास कुठले पदार्थ खावे याविषयी आम्ही आज सांगणार आहोत. अवेळी लागणार्‍या भूकेच्या वेळेस चूकीचे पदार्थ खाल्ल्यास त्रास अधिक वाढू शकतो. म्हणूनच सुकामेव्यातील या काही पर्यायांची निवड करा. म्हणजे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत  होते. 

१)     इन्सुलिन सेन्सिटीव्हिटी सुधारण्यासाठी बदाम फायदेशीर ठरतं. त्यामुळे अवेळी भू क लागत असल्यास काही बदाम खाण्याची सवय ठेवा.  

२)     अक्रोडमध्ये फायबर घटक मुबलक असतात. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण आटोक्यात राहण्यास मदत होते.

३)     नियमित काजूचा आहारात समावेश केल्यास मधूमेहाचा धोका आटोक्यात ठेवण्यास मदत होते. 

४)     पिस्त्यामध्ये फायबर घटक मुबलक असतात. तसेच कॅलेरीज कमी असतात. मधूमेहींसाठी अवेळी लागणार्‍या भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पिस्ता फायदेशीर ठरते.  नियमित पिस्ता खाणार्‍यांमध्ये मधूमेहाचा धोका तुलनेत कमी असतो.  

५) आमटी, भाज्यांमध्ये मखाणांचा वापर करु शकता. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणामध्ये ठेवण्यास मदत होते. 

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here