कॉंग्रेसचे सत्यजित तांबे सांगत आहेत बिहार निवडणुतील सध्याचा अनुभव; वाचा, काय म्हटलंय त्यांनी

मुंबई :

सध्या देशाच्या राजकीय पटलावर बिहार निवडणूक चर्चेत आहे. महाराष्ट्रातून रवाना बिहार निवडणुकीसाठी अनेक नेते झाले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे बिहार निवडणूक प्रभारी आहेत. तर कॉंग्रेसकडूनही मोठी फौज प्रचारात उतरली आहे. या दरम्यान महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबेही बिहारला प्रचारासाठी गेले आहेत. यावेळी त्यांना येत असलेला अनुभव त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून सांगितला आहे.

नेमकं काय म्हटलं आहे तांबेंनी :-

मी आजवर जगभरातील बर्‍याच निवडणुका पाहिल्या आहेत,जवळून अनुभवल्या आहेत.अगदी अमेरिकेच्या निवडणूक असो वा भारतातील विविध स्तरांच्या आणि वेगवेळ्या प्रकारच्या निवडणुका बघितल्या आहेत. परंतु सध्याची बिहार निवडणूक म्हणजे पूर्णपणे नवीन अनुभव.

इकडची राजकीय सामाजिक आणि जातीय समीकरणे इतकी गुंतागुंतीची आणि परस्परविरोधी आहेत की नक्की काहीच सांगू शकत नाही ,

मुख्य प्रवाहातील न्यूज चॅनेल्सपेक्षा फेसबुकवर आणि युट्युबवर चालणाऱ्या वेगवेगळे स्थानिक न्यूज चॅनेल्सची संख्या मोठी आहे, प्रत्येकाचे रिपोर्टिंग वेगळे, कसलाच कौल नक्की बांधता येत नाही, सगळंच अनिश्चित.

फक्त प्रयत्न करणे हातात राहतं..

खरं तर मी येथे माझ्या पक्षाच्या निवडणूक कामात मदतीसाठी कार्यकर्ता म्हणून आलो होतो; पण आता राजकारणाचा विद्यार्थी म्हणून मी बर्‍याच नवीन गोष्टी शिकत आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here