मेहंदी लावण्याचे ‘हे’ आहेत गंभीर दुष्परिणाम; वेळीच घ्या जाणून अन्यथा…

आपल्या भारतीय संस्कृतीत एकही सण-उत्सव विना मेहंदी पूर्ण होत नाही. आपल्या संस्कृतीत स्रिया आणि काही ठिकाणी पुरुषही मेहंदी लावतात. आजकाल स्री- पुरुष असे काही न बघता आवडीने सगळेच लोक मेहंदी लावतात. पण तुम्हाला माहिती आहे का? मेहंदी लावण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. काळ्या किंवा तपकिरी रंगाची मेहंदी लावणे हानीकारक आहे. शुद्ध हिरवी मेहंदी लावल्याने त्वचेवर कोणतेच दुष्परिणाम होत नाहीत.

हे आहेत दुष्परिणाम :-

PPD त्वचेच्या संपर्कात आल्याने अॅलर्जी होऊ शकते. उदा.; खाज येणे, लालसर होणे, आग होणे किंवा सूज येणे. PPD म्हणजेच पॅरा-फेनिलीनडायअमाइन हे अनेक प्रकारच्या मेहंदीमध्ये रंग येण्याकरिता मिसळलेले जाते.

केसांना लावण्याची मेहंदीत तक रासायनिक घटक मिसळलेले असतात. परिणामी केस शुष्क होतात. तसेच डोक्याला खाज सुटते, कधीकधी पुरळही येऊ शकतात.

मेहंदीचा जर कुठल्याही प्रकारे डोळ्यांशी संपर्क आला तर डोळे लाल होतात किंवा डोळ्यांतून पाणी येऊ लागते.

काही मुलांना G6PD ची (6 ग्लुकोज फॉस्पेट डिहायड्रोजनेजची) कमतरता असेल त्यांच्या हातांना मेहंदी लावू नये. नाहीतर त्यांच्या शरीरातील लाल पेशी फुटून शारिरीक समस्या निर्माण होतील.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here