अशी बनवा ‘मुघलई शाही चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा

बिर्याणी म्हटलं की सर्वांचीचं आवडती… मग ती व्हेज असो अथवा नॉन व्हेज. ही बिर्याणी बनवायला थोडा वेळ लागतो पण खाताना मात्र बोटं चाटत राहाल, इतकी चवदार आणि चमचमीत, झणझणीत आहे. नेहमी बिर्याणीचे तेच ते प्रकार करून कंटाळा आला असेल तर हा बिर्याणी प्रकार नक्कीच ट्राय करून बघा.

 साहित्य घ्या मंडळी :-

 1. 800 ग्रॅम चिकन
 2. 4 कप बासमती तांदूळ
 3. 6 कांदे पातळ कापले
 4. 4 तमालपत्र
 5. 3 ब्राऊन वेलची
 6. 4 हिरवी वेलची
 7. 1/2 इंच दालचिनी
 8. 4 लवंगा
 9. 2 चमचे शहाजिरे
 10. 1/2 टीस्पून जायफळ
 11. 1/2 टीस्पून गदा
 12. 1 टीस्पून मिरपूड
 13. 2 टीस्पून लाल तिखट
 14. 1/2 टीस्पून हळद
 15. 2 टीस्पून धणे पूड
 16. 5 हिरव्या मिरच्या
 17. 20 ग्रॅम आले
 18. 16 लसूण फ्लेक्स
 19. 1 कप कोथिंबीर
 20. 2 टोमॅटो चिरले
 21. 1 टीस्पून केशरचे कोळे दुधात विरघळले
 22. 1 कप दही
 23. 1/2 कप तूप
 24. चवीनुसार मीठ
 25. 1 कप पुदीना
 26. 1/2 टीस्पून खायचा रंग

साहित्य घेतले असेल तर चला बनवायला सुरुवात करू

चिकनसाठी- आले-लसूण पेस्ट घाला त्यामधे हळद,  मीठ लाल तिखट आणि दही एकत्र करून कोंबडीत घालावा. चांगले मिक्स करावे आणि 1 तासासाठी बाजूला ठेवा.
मोठ्या फ्राईंग पॅनमध्ये तेल सुमारे 2 मिनिटे गरम करा, कांदे आडवे कट करा, प्रत्येक बॅचला 3/4 चमचे मीठ घालावे आणि कांदे गोल्डन ब्राऊन व कुरकुरीत होईपर्यंत तळा.

कुरकुरीत तळलेले कांदे बाजुला ठेवा. मध्यम आचेवर त्याच पॅनमधे तेलात कांदे, आले लसूण टोमॅटो घाला. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा. मिक्सरला वाटा. आता एका भांड्यामधे
तेल घाला. तेलात सुमारे 5 मिनिट मॅरीनेट केलेल चिकनला परतुन घ्या. 5 कप पाणी घाला. मध्यम आचेवर शिजवा. चिकन शिजल की चिकनमधे मिक्सरच वाटन घालावे. सर्व मसाला परतुन घ्या. चिकन मसाला, गरम मसाला, सर्व मसाले घाला. कोथिंबीर घाला.

तांदळासाठी :-
तांदूळ धुवा आणि पाण्यात 15 मिनिटे भिजवा. 4 कप तांदळासाठी 6 वाटी पाणी घालून, वेलची तपकिरी आणि हिरवी, जिरे, लवंगा, तमालपत्र, मीठ आणि दालचिनीची काडी घाला. ते व्यवस्थित शिजल्यानंतर तांदूळ काढा आणि थाळी किंवा मोठ्या पॅनवर पसरवा.

एका भांड्यामधे २ चमचे तूप घाला. शिजवलेल्या तांदळाचा थर त्यानंतर चिकनचा थर ठेवा. तळलेल्या कांद्याचा थर ठेवा, शिजवलेल्या तांदळाच्या थरासह पुन्हा चिकन आणि नंतर तांदळाच्या थरासह समाप्त करा. थोडे तूप, केशर, तळलेले कांदे आणि पुदीना पाने शिंपडा. 15 मिनिटे कमी आचेत ठेवू शकता. आता त्यावर दम देउन सर्व करु शकता.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here