असा बनवा चवदार आणि झणझणीत ‘लाहोरी चिकन कोरमा’; रेसिपी वाचा एका क्लिकवर

चिकन म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल, त्यातही अशी शाही लेगपीस ठेवलेली डिश समोर असल्यावर खायचं मन तर होणारच ना… आज आम्ही तुम्हाला ‘लाहोरी चिकन कोरमा’ची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ पाकिस्तानमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे. पाकिस्तानी हा पदार्थ थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवतात. आज ही रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा… तुम्हाला आवडेल यात शंकाच नाही.

साहित्य घ्या मंडळी :-

 1. 500 ग्रॅम चिकन
 2. 1 वाटी ताजे दही
 3. 2 कांदे
 4. 1 टेबलस्पून आल लसूण पेस्ट
 5. 1 टेबलस्पून लाल तिखट
 6. 1/2 टेबलस्पून मीठ
 7. 1/2 टेबलस्पून हळद
 8. 1/2 टेबलस्पून धने पूड
 9. 1/2 टेबलस्पून गरम मसाला
 10. 1 टेबलस्पून कसुरी मेथी
 11. 1/2 टेबलस्पून साखर
 12. 2 टेबलस्पून बटर
 13. 1 मसाला वेलची
 14. 2 हिरवी वेलची
 15. 2 टेबलस्पून तूप
 16. 1 टेबलस्पून कसुरी मेथी

साहित्य घेतले असेल तर चला बनवायला सुरुवात करू, कृती पहा मंडळीहो…

 1. कढईत तूपात मसाला वेलची, दालचिनी आणि हिरव्या वेलची घालून परतवावे त्यानंतर त्यात टोमॅटो, कांदा,आल लसूण घालून पेस्ट बनवा व ती तूपात परतवावे.
 2. पाच मिनिटांनी त्यात लाल तिखट, हळद मीठ घालून घ्यावे मसाला शिजण्याकरिता थोडे थोडे पाणी घालून शिजू द्यावे पाणी आटत आले की मसाला तेल सोडू लागतो.
 3. त्यात आता दही घालून चांगले हलवावे व नंतर चिकनचे पिस घालून हलवावे.
 4. हलवावे म्हणजे चिकनला पाणी सुटते.झाकण ठेऊन किमान पंधरा मिनिटे ठेवावे नंतर हाताने चेक करावे पिस तूटत असेल तर शिजलेले समजावे. आता कसुरी मेथी चुरून घालून घ्या.
 5. कोथिंबीर चिरून घालावी व सर्व्ह करावे गरमागरम नान, कुलचा किंवा चपाती सोबत.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here