एकनाथ खड्सेंचा ‘त्यांना’ टोला; ‘तेव्हा’ राष्ट्रवादी चांगला वाटलं होता ना?

मुंबई :

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकला असून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्यानंतर अनेक समीकरण बदलताना पाहायला मिळत आहेत. भाजप नेते एकनाथ खडसे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होत आहे. यावेळी ‘सकाळी पाच वाजता शपथविधी घेतला तेव्हा नीतिमत्ता कुठे होती. तेव्हा राष्ट्रवादी चांगला वाटलं होता ना?’, असे म्हणत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी टोला हाणला आहे.

पुढे बोलताना खडसे म्हणाले की, मी कोणतीही अपेक्षा ठेवली नाही,पक्षाचे काम करत राहणार. भाजप जशी वाढवली त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढवून दाखवणार. माझ्यावर विनयभंगाचा खटला टाकला..आयुष्याची चार वर्षे वाया घालवली. भूखंडाच्या चौकश्या लावल्या. जयंतराव कोणी किती भूखंड घेतले आता सांगतो.

आज राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसेंसोबत त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनीही भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here