मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा; अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना ‘एवढी’ मदत

मुंबई :

राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीचे चित्र निर्माण झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

पूर आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तातडीनं मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षांकडून, शेतकरी संघटनांकडून सातत्याने होत होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदतीबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमधील इतर मंत्री आणि महत्वाचे नेते उपस्थित होते.

या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करत सांगितले की, ही मदत नुकसानग्रस्तांना तातडीनं वितरित करण्यात येणार आहे. पुढे बोलताना त्यांनी राज्याचे केंद्राकडे ३८ हजार कोटी थकीत असून केंद्रानं अजूनही ही रक्कम दिली नसल्याचं सांगितलं आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here