खडसे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच; ‘या’ केंद्रीय मंत्र्यांची नवी माहिती, वाचा काय आहे प्रकरण

मुंबई :

राज्याचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत हाती घड्याळ बांधले. मात्र भाजपसोडण्यापूर्वी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विविध आरोप केले. सध्या भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी विविध मुद्दे घेऊन खडसेंवर हल्लाबोल केला आहे. अशातच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एक नवी माहिती समोर आणली आहे. ‘खडसे हे मूळचे राष्ट्रवादीचेच आहेत. ते मूळचे भाजपचे नाहीतच,’ असं दानवे यांनी  ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.  

दानवे म्हणाले की, ‘खडसे हे एस काँग्रेसमध्ये होते. शरद पवारांनी जळगावपासून नागपूरपर्यंत दिंडी काढली होती, तेव्हा खडसे हे एस काँग्रेसमध्येच होते. मी मूळचा भाजपचा आहे आणि खडसेंना सीनियर आहे. खडसे, मुंडे यांच्यासह आम्ही अनेकांनी एकत्र काम केलं असल्यामुळं आमच्या एकमेकांच्या वाटचालीबद्दल माहीत आहे’.

पुढे बोलताना ‘प्रदेशाध्यक्ष पद एकनाथ खडसेंना देऊनही त्यांनी नाकारल्यामुळे देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष झाले. जर प्रदेशाध्यक्ष एकनाथ खडसे झाले असते तर कदाचित खडसे त्यावेळी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असते’, असा गौप्यस्फोट दानवे यांनी केला.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here